संस्थेचा इतिहास
महाराष्ट्रातील सुवर्णकारांचे श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांचे पहिले मंदिर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील आहे व दुसरे मंदिर श्री संत नरहरी महाराज सुवर्णकार संस्था बालाजी कोट नासिक हे आहे. सुवर्णकारांचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज हे आहेत. नरहरी महाराज हे सुवर्णकारांच्या गुरुस्थानी आहेत.
श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था बालाजी कोठ नासिक या संस्थेची स्थापना सन १९६९/७० च्या दशकात झाली व सन१९७२ साली समाज मंदिराची वास्तु खरेदी केली. या संस्थेच्या वास्तुरूपी वटवृक्षाची मुहूर्तमेढ त्यावेळी आपले समाज धुरीण कै. एकनाथशेठ आडगावकर, कै विश्वनाथशेठ आंबेकर, प्रभाकर शेठ नागरे, दामोदरशेठ आंबेकर, पंडितराव नागरे, दामोदरशेठ आडगावकर, मधुकर शेठ नागरे, वामनराव नागरे, जयराम शेठ कुलथे, भीमाशंकरशेठ कुलथे, गजाननशेठ गुळवंचकर, निवृत्ती शेठ नागरे, राजारामशेठ शहाणे, गोपीनाथशेठ शिंदेकर, व्यंकटराव ठाणेकर, एकनाथशेठ उदावंत, मधुकरशेठ पळसेकर, मुरलीधर शेठ दौंडकर, दत्तात्रयशेठ कुलथे भगूरकर, बाळासाहेब आंबेकर, मुरलीधरशेठ कुलथे, दिगंबर शेठ शहाणे, यांनी प्रयत्नाने रोवली. या वास्तूचा व्यवहार बोलनी श्री प्रभाकर शेठ निवृत्ती नागरे यांनी केली. व ही वास्तु १७/१/१९७२ रोजी खरेदी केली व पहिले अध्यक्ष श्री एकनाथ शेठ काजळे आडगावकर हे झाले. उर्वरित कार्यकारी मंडळापैकी एका सदस्याची निवड चिठ्ठी टाकून करण्यात आली व तो मान श्री गोपाळ लक्ष्मणशेठ शहाणे शिंदेकर यांना मिळाला. तसेच वास्तुशांतीचा मान लिलाव पद्धतीने मुरलीधर सखारामशेठ कुलथे किरतांगळीकर यांनी पटकावला. व संस्थेचे सध्या असलेले नाव हे जयराम शेठ मुरलीधर शेठ कुलथे किरतांगळीकर. यांनी सुचविले.
यानंतर युवा वर्ग समाजाच्या कामकाजात हिरीरीने भाग घेऊ लागला. सन१९८७ साली गिरधर शेठ आडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली राजाभाऊ शहाणे, शिंदेकर केशवराव नागरे, आडगावकर, दामोदर आंबेकर, इत्यादींच्या सहकार्याने भारतातील लाड सुवर्णकार समाजाचे पहिले अधिवेशन नाशिकच्या संस्थेने भरविले व ते यशस्वी करून दाखविले. तसेच संस्थेच्या सदस्या सरलाताई नागरे यांच्या पुढाकाराने महिला मंडळ स्थापन करण्यात आले व सरलाताई पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या.
यानंतर १९९३/९४ साली कृष्णा नागरे यांच्या अध्यक्षतेखाली जुनी इमारत उतरवून नवीन इमारत बांधण्यास सुरुवात केली व राजेंद्र कुलथे, शरद नवसे ,अरुण मैड, प्रकाश बुऱ्हाडे रमेश लोळगे, सुनील महालकर, यांचे अध्यक्षीय कारकीर्तीत पूर्ण झाली. यावेळी युवा फाउंडेशन ग्रुपला सभागृह (हॉल) सजावटीची जबाबदारी देण्यात आली ही जबाबदारी त्यांनी लीलया पेलली व सुंदर अशी सजावट केली. या कामी फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज साकुरकर, विवेक मालवी, राम नागरे, मुकुंद शहाणे, अजित नागरे, यांनी तन-मन-धनाने मेहनत केली.
सन१९७० ते आजतागायत खालील अध्यक्ष व सेक्रेटरी यांनी संस्था प्रगतीसाठी योगदान दिले अध्यक्ष-एकनाथ नारायण शेठ काजळे आडगावकर, दत्तात्रय तुकाराम शेठ कुलथे, केशवराव निवृत्ती शेठ नागरे ,जगन्नाथ भानुदास शेठ कुलथे, कृष्णा पंडितराव नागरे, राजेंद्र जयराम शेठ कुलथे, शरद राधाकिसन नवसे, अरुण रघुनाथशेट मैड, प्रकाश निवृत्ती शेठ बोराडे ,रमेश भाऊराव लोळगे ,सुनील एकनाथ महालकर, संजय गंगाधर मंडलिक.
सेक्रेटरी-प्रभाकर निवृत्ती शेठ नागरे, जयराम मुरलीधर शेठ कुलथे, दत्तात्रय गंगाधर शेठ सोनार, प्रवीण निवृत्ती शेठ नागरे, सुनील एकनाथ महालकर, अरुण रघुनाथ मैड, प्रसाद गजानन आडगावकर, रमेश भाऊराव लोळगे, रमेश भास्कर उदावंत, विवेक जगदीश मालवी, या लोकांनी व याच्या कार्यकारी मंडळाने संस्थेचा कारभार बघितला व समाज प्रगतीसाठी प्रयत्न केले.
🙏🙏🙏





